21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeबीडबीडमध्ये अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

बीडमध्ये अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

एकमत ऑनलाईन

बीड : बीडमध्ये कार आणि टेम्पोच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पाटोदा तालुक्यातील बामदळे वस्तीवर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाटोदा- मांजरसुबा रस्त्यावर हा अपघात घडला आहे. या अपघातात स्विफ्ट कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या पाटोदा -मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ बामदळे वस्ती येथे स्विफ्ट डिझायर कार-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाले आहे. घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजिक कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, बामदळे वस्ती जवळ कारमधील चौरे ( कुटे) परिवार लग्नासाठी केजकडे जात होते. पाटोदा मांजर सुंभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ कार (स्विफ्ट डिजायर) क्रमांक (एम.एच.१२के.एन ९७६१) व आयशर टेम्पोचा (क्रमांक एम.एच.२६ बी.ई.५९४५) अपघात झाला. आयशर टेम्पो व दुभाजकाच्यामध्ये स्विफ्ट अडकलेली होती. गाडीमधील लहान मुलासह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या