22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

पुण्यात अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

एकमत ऑनलाईन

पुणे : अ‍ॅम्बुलन्स नाशिकहून बाजूने पुण्याच्या दिशेने चालली होती. समोरून आलेल्या दुचाकीची रुग्णवाहीकेला चालकाच्या बाजूने जोरदार धडक बसली. पण त्यात काही फूट अंतर दुचाकी ओढत गेली.

पुणे : पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा तरुणांचा जीव गेला आहे. रुग्णवाहिका आणि बाईक यांच्या जोरदार धडक झाली. समोरसमोरच झालेल्या भीषण धडकेत दोघा तरुणाचा जागच्या जागी मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते. पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळ हा भीषण अपघात झाला.

गेल्या २४ तासांत झालेल्या दोन अपघातामध्ये चार तरुणांनी जीव गमावला आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातातही दोघा बाईकस्वार तरुणांचा मृ्त्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुणे-नाशिक हायवेवरही भीषण अपघातात आता आणखी दोघा तरुणांनी जीव गमावला आहे.

राजगुरुनगर शहरादवळ पुणे-नाशिक महामार्गावर शासकीय विश्रामगृहाजवळ हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचे वय अवघे 23 वर्ष होते. आतिश नंदकिशोर सोमवंशी आणि मयूर अशोक पवळे अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या