पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीवर २५२,१२०, ३०७, ३३२या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन थोरात, शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
उदय सामंत यांच्या ताफ्यावर काल रात्री कात्रज भागात हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पोलिसांनी काही जणांना अटक करून त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती.
रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील या पाच जणांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.