27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रउमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीला तुरुंगात मारहाण!

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीला तुरुंगात मारहाण!

एकमत ऑनलाईन

मुंबई : अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शाहरूख पठाण याच्यावर ऑर्थर रोड तुरुंगात हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. पाच जणांनी त्याला मारहाण केली असून या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. एनआयएने याप्रकरणी सात आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, यातील आरोपी ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. यांपैकी शाहरूख पठाण हा आरोपी ज्या बराकीमध्ये आहे त्याच बराकीतील पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला.

पाच लोकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी या पाच जणांवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पण मारहाणीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

२१ जून रोजी अमरावतीत झाली होती हत्या
उदयपूरच्या कन्हैयालाल याच्या हत्येनंतर २१ जून रोजी अमरावतीमध्ये ५४ वर्षीय उमेश कोल्हे यांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली होती. कारण होते नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांच्याकडून करण्यात आलेली पोस्ट.

उमेशचा मुलगा संकेत कोल्हे याने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी २३ जून रोजी मुदस्सीर अहमद (वय २२) आणि शाहरूख पठाण (२५) या दोघांना अटक केली. दोघांची चौकशी केल्यानंतर हत्येत आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. उर्वरित आरोपी अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतिब रशीद (२२) आणि शमीम फिरोज अहमद यांनाही अटक करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या