21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीय  जालन्याच्या छापेमारीनंतर ओडिशात मराठी व्यक्तीवर कारवाई

  जालन्याच्या छापेमारीनंतर ओडिशात मराठी व्यक्तीवर कारवाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकीकडे जालना आणि औरंगाबाद येथे आयकर विभागाने छापेमारी करत ३९० कोटींचे घबाड जप्त केले आहे. याची चर्चा सुरू असतानाचा आता ओडिशा येथे उत्पादन विभागाने एका मराठी व्यवयायिकावर कारवाई करत त्याच्याकडून १.२२ कोटींची रोकड जप्त केली आहे.

याशिवाय या व्यापा-याकडून २० सोन्याची बिस्किटेदेखील जप्त करण्यात आली आहे. गंजम जिल्ह्यातील महामार्गावर ९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत एएनआयने ट्वीट केले असून यामध्ये ओडिशा येथे केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील एका व्यावसायिकाकडून १.२२ कोटींची रोख आणि २० सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. गंजम जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी लांजीपल्ली येथील महामार्गावर ९ ऑगस्ट रोजी रात्रीच्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे.

सध्या उत्पादन विभागाच्या अधिका-यांनी गांजाच्या तस्करीबाबत धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईदरम्यान, अधिका-यांनी या व्यावसायिकाकडून वरील मुद्देमाल जप्त केला असून, कारावाई केलेली व्यक्ती ड्रग्ज डिलर असून. ती महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. मात्र, ती नेमकी कोण याची कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.
छापेमारीची राज्यात सर्वदूर जोरदार चर्चा सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या