23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeमहाराष्ट्रकंगनावरील कारवाई नियमानुसारचं

कंगनावरील कारवाई नियमानुसारचं

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतचे मागील काही दिवसांपूसन राजकीय वाद चालू आहेत. या वादादरम्यान कंगणाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली होती कंगनाचे कार्यालय तोडण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये सुशांतसिंग राजपूत प्रकरण आणि कंगनाचे महाराष्ट्र सरकारवर टीका यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. या रागातूनच ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने केला होता.

या कारवाईविरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने आज याप्रकरणी बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल, असेही न्यायालयाने फटकारले आहे.

त्यामुळे भाजपने देखील मुंबई महापालिकेसह राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले असतानाच मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र, मुंबई महापालिकेने केलेली कारवाई महापालिकेच्या नियमानुसारच केली आहे. मी अद्याप कोर्टाने दिलेला निकाल वाचलेला नाही. तो वाचल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल, असे सांगितले आहे़

शेतक-यांना डांबण्यासाठी स्टेडियम नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या