19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयसीबीआयकडून चार राज्यात कारवाई

सीबीआयकडून चार राज्यात कारवाई

एकाच वेळी ४५ ठिकाणी छापे ; कोळसा माफिया व भ्रष्टाचाराविरोधात कारवाई

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाची सर्वाेच्च तपास संस्था सीबीआयने शनिवारी चार राज्यात जवळपास ४५ ठिकाणी एकाचवेळी छापा मारला. कोळसा माफिया व भ्रष्टाचाराविरोधात सीबीआयने हा छापा मारला असून पश्चिम बंगाल, झारखंड,उत्तरप्रदेश व बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दीड वर्षांपुर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात छापा टाकण्यासाठी सीबीआयची टीम गेली होती. मात्र त्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रात्रभर आंदोलन करीत राज्यात सीबीआय तपासाची परवानगी काढून घेतली होती. सध्या राज्यात विधानसभा निवडणुक जवळ आल्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. ही कारवाई अन्य तीन राज्यातही चालू असून ईस्टर्न कोलफील्ड्स, रेल्वे, सीआयएसएफच्या अधिकाºयांवर छापे टाकण्यात आले आहेत. या अधिकाºयांवर गुन्हेदेखील दाखल केले आहेत.

कारवाईवर शंका उपस्थित
महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पुढील काही महिन्यात निवडणूक असून अमित शहा तेथे असताना ही कारवाई झाल्यामुळे शंका व्यक्त केली जात आहे. भाजपकडून गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर विविध प्रकारच्या चौकशा लावल्या जातात व दबावाखाली त्या नेत्याला स्वत:कडे ओढून घेतले जाते. आगामी काही महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून राज्यात कोणत्याही प्रकारे सत्ता आणायचीच या निश्चयाने भाजपकडून व्युहरचना केली जात आहे. शुक्रवारीच तृणमूल कॉंग्रेसच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला असून राजीनामा दिलेल्या एका मंत्र्याचीही वाटचाल भाजपच्या दिशेने असल्याची चर्चा केली जात आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही भाजपकडून दबावाचे राजकारण सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोना भारतातून जगभरात पसरला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या