26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमनोरंजनअभिनेते पुनीत राजकुमार कालवश

अभिनेते पुनीत राजकुमार कालवश

एकमत ऑनलाईन

बेंगळूरू : कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू, राजकारणाती दिग्गजांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

अभिनेता आर. माधवनने ट्वीट करत पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमच्यातील सर्वात दयाळू, छान आणि उदात्त असलेला तो गेला. मला आता फार उद्धवस्त झाल्यासारखे वाटत आहे. तुम्ही आम्हाला फार गोंधळात टाकले आहे. मला अजूनही आशा आहे की हे खरे नाही, असे ट्वीट आर. माधवन याने केले आहे. तर अभिनेता सोनू सूदने धक्कादायक, तुझी फार आठवण येईल, अशा शब्दात शोक व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या