20.9 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमनोरंजनअभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांना व्हायचेय ‘महापौर’

अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांना व्हायचेय ‘महापौर’

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी होत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या मोठ्या राजकीय निर्णयाचा परिणाम सोशल मीडियावरील नेटक-यांवरही दिसून येतो आहे.

त्यांच्या प्रतिक्रियांमधून वेगवेगळ्या प्रकारची सूचक विधानेही लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. या सगळ्यात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची बातमी समोर आली आहे.

दिशाच्या वडिलांना आता राजकारणात जाण्याचे वेध लागले आहेत. सोशल मीडियावर जगदीश पटानी येत्या काळात महापौरपदाची निवडणूक लढवताना दिसणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. एका वृत्तामध्ये आलेल्या माहितीनुसार येत्या काळात जगदीश सिंग पटानी हे राजकारणात दिसण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी यावेळी राजकीय प्रवेशाविषयी भाष्य केले होते.

जगदीश पटानी यांनी आता सनदी अधिकारी पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. यापुढील काळात राजकारणात येऊन समाजसेवा करण्याचा त्यांचा मानस असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर येत्या काळात जगदीश हे बरेली शहरातून महापौर पदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या