18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeदिव्यांगाच्या मागण्या मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन

दिव्यांगाच्या मागण्या मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन

एकमत ऑनलाईन

हदगाव : दिव्यांगाच्या विविध मागण्या मार्गी लावाव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीच्या वतिने तहसिलदार जिवराज डापकर यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला.

जागतिक दिव्यांग दिन सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरा करावा. नविन दिव्यांग मंत्रालयात शिपाई पासुन ते सचिवापर्यंत सर्व दिव्यांग कर्मचा-यांची नियुक्ती करावी. दिव्यांग व्यक्तीला एस.टी. बस प्रवास हा निशुल्क द्यावा. दिव्यांग व्यक्तीला दि २१ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार दिव्यांगाला अंत्योदय राशन कार्ड व राशन त्वरित लाभ द्यावा.

ग्राम पंचायत, नगर पंचायत, नगर पालिकेच्या हद्दीतील शासकीय व निमशासकीय कार्यालयात व मुख्य ठिकाणी दिव्यांगाला व्यवसाय करिता २०० स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून स्वयं रोजगारासाठी जागा द्यावे. दिव्यांग व्यक्तीला प्रथम प्राधान्याने घरकुल योजनेत त्वरित लाभ घ्यावा.नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग व वयोवृद्ध आणि विधवा करिता संजय गांधी निराधार योजनेचे विशेष शिबिराचे आयोजन करावे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धपकाळ योजना व इंदिरा गांधी योजनेतील सर्व लाभाथ्यार्चे मासिक अनुदान हे पाच हजार रुपये प्रमाणे वाढ करावे, व तसेच दरमहा अनुदान वेळेवर त्यांच्या खात्यावर जमा करावेत. स्थानिक विकास मतदारसंघातील आमदार खासदार यांनी दिव्यांग व्यक्तीवर पाच टक्के निधी तात्काळ खर्च करावा. नांदेड जिल्ह्यात जेथे दिव्यांग बोर्ड चालु आहे तिथे सर्व दिव्यांग प्रवगार्तील मुक बधिर, मतिमंद, नेत्रहीन, पक्षघात थॅलेसिमीया इतर सर्व प्रवर्ग दिव्यांगाची तपासणी करून त्वरित दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे.

स्वयंरोजगारासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे. दिव्यांगाच्या कामासाठी आठवड्यातील एक दिवस देऊन त्याच ठराविक दिवशी दिव्यांगाचे संपुर्ण कामे करावे, आदी मागण्या या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेतÞ यावेळी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल, जमीर पटेल, शिवराज महाजन, पांडुरंग धनगरे, गंगाराम कल्याणकर, कुबेर राठोड, दिपक सूर्यवंशी, अंिजक्य चव्हाण, फारुक कुरेशी, अहमद भाई , धुरपत सूर्यवंशी शेख इम्रान, प्रियंका राठोड,शेख साजिद, शेख गौस, बंडु पाटे, पवन गंधारे इतर सर्व दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या