22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रआढळराव पाटील विश्वासूच, हकालपट्टी नाही; शिवसैनिकांशी ठाकरेंचा संवाद

आढळराव पाटील विश्वासूच, हकालपट्टी नाही; शिवसैनिकांशी ठाकरेंचा संवाद

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीची बातमी ‘सामना’त अनावधानाने आली असून याबाबत मी आढळराव पाटील यांच्याशी चर्चा केली आणि आता सर्व गैरसमज दूर झाले. आढळराव पाटील हे आमचे विश्वासूच आहेत त्यांना मंगळवारी (ता. 5) मातोश्री’वर बोलवले, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

माजी खासदार आढळराव पाटील यांच्यासह आज मातोश्री’वर शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांची बैठक झाली. त्यावेळी ठाकरे बोलत होते.

ठाकरे उतरले मैदानात

सत्ता गमावल्यानंतर आणि स्वकीयांनीच दगाल दिल्याने दुखावलेले शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. शिवसैनिकांची एकजूट करण्यासाठी ते शिवसैनिकांच्या भेटी-गाठी घेत आहेत. शिवसैनिकांशी मोकळा संवाद आणि हितगूज ते साधत आहेत. शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठीच मातोश्रीवर आयोजित केलेली बैठक हा त्याचाच एक भाग आहे.

या पोस्टमुळे आढळराव आले होते अडचणीत

शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज ंिहदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे नमुद केले होते. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटोही आढळराव पाटील यांनी टाकला नव्हता.

हकालपट्टीचे शिवसेनेनेच काढले होते पत्रक

शिवाजीराव आढळराव पाटील हे सेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहितीही देण्यात आली. त्यानंतर स्वत:च्याच मुखपत्रात हे वृत्तही प्रकाशित झाले होते. त्यावर आता सारवासारव उद्धव ठाकरे यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या