16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्र‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही ; राम कदमांचा आक्रमक पवित्रा

‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही ; राम कदमांचा आक्रमक पवित्रा

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रटावरुन सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. या टीजरवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत. चित्रपटातील व्यक्तीरेखांचा लुक पाहून गदारोळ माजला आहे. यावर आता राजकीय व्यक्तींनीसुद्धा आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे.

नुकतंच भाजप आमदार राम कदम यांनी कठोर शब्दात या चित्रपटावर टीका केली आहे. इतकंच नव्हे तर चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आमदार राम कदम यांनी काही वेळेपूर्वी एक ट्विट करत म्हणाले, ‘आदिपुरुष’ चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पुन्हा एकदा चित्रपट निर्मात्यांनी फालतू लोकप्रियता मिळवण्यासाठी आमच्या देवी-देवतांचा अपमान केला आहे. आमच्या देवी-देवतांचा अपमान करत या लोकांनी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

आता वेळ आली आहे फक्त माफीनामा की विडंबन ठरवण्याची.’ अशा शब्दांत चित्रपटाला विरोध केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या