18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रसत्तारांकडून आदित्य ठाकरेंचा आता ‘रणछोडदास’ म्हणून उल्लेख

सत्तारांकडून आदित्य ठाकरेंचा आता ‘रणछोडदास’ म्हणून उल्लेख

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू, दुसरा पप्पू म्हणून उल्लेख करण्यात आला होता.

तर आता सत्तार यांनी टीका करताना आदित्य ठाकरे यांचा रणछोडदास म्हणून उल्लेख केला आहे. सिल्लोड येथे आदित्य ठाकरे यांच्या होणा-या सभेवर बोलताना सत्तार यांनी ही टीका केली आहे.

सत्तार म्हणाले की, सिल्लोड येथील सभेला परवानगी नाकारली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या होत असलेल्या सभेचे ठिकाण सोडून इतर कोणत्याही ठिकाणी सभा घेण्यासाठी पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना परवानगी दिली आहे.

आमची सभा असलेल्या ठिकाणापासून ते पंधरा फुटांवर परवानगी मागत आहेत. त्यामुळे त्यांना परवानगी देणे शक्य नाही. त्यामुळे उगाच पोलिसांच्या नावाची बदनामी करून रिकामचोट रणछोडदास बनू नका, असा टोला सत्तार यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना ज्या ठिकाणी सभा घ्यायची आहे त्या ठिकाणी गरज पडल्यास स्टेज उपलब्ध करून देतो. मंडप नसेल तर मंडप देतो, माईक नसेल तर तेही देतो परंतु सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांनी सभा घ्यावी असे सत्तार म्हणाले.

आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांना चॅलेंज करतात, मात्र मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करणारा माणूस त्यांच्या मुलासमोर लढू शकत नसेल तर त्याला रणछोडदास म्हणावे लागले, असेही सत्तार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या