23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरे पहिल्याच अधिवेशनाला मारणार दांडी ?

आदित्य ठाकरे पहिल्याच अधिवेशनाला मारणार दांडी ?

एकमत ऑनलाईन

मुंबई : जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० अशा ५० आमदारांना घेऊन बंड केले. शिंदे-फडणवीस यांनी ३० जूनला शपथ घेतल्यानंतर ३९ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ९ऑगस्टला भाजपचे ९ तर शिवसेनेच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला खातेवाटपही करण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन सुरू होत आहे. १७ ऑगस्टपासून मुंबईत पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे, पण या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे उपस्थित नसतील.
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा १७ ऑगस्टपासूनच सुरू होत आहे.

रायगड जिल्ह्यातल्या दोन ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग आणि महाडमध्ये १७ ऑगस्टला आदित्य ठाकरेंचा हा एक दिवसाचा दौरा असेल, त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते हजर नसतील.

शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्ष संघटनेकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. शिवसंवाद यात्रेमधून आदित्य ठाकरे बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन मेळावे आणि सभा घेत आहेत. या प्रत्येक मेळाव्यात आणि सभेत आदित्य ठाकरे बंडखोरी केलेल्या आमदारांचा उल्लेख गद्दार असा करून त्यांच्यावर घणाघाती टीका करत आहेत.

शिवसेना नक्की कुणाची? यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे, त्यामुळे पक्ष वाचवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे, तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तोंडावर आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरे विधिमंडळ कामकाजापेक्षा पक्ष बांधणीवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत, असेच दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या