18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौ-यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शेतक-यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ असताना कृषिमंत्री कुठेही दिसत नाहीत. शेतक-यांना मदतीची गरज असताना कृषिमंत्री आणि घटनाबा सरकार गायब असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारमध्ये महिला सुरक्षित नसल्याची टीकाही केली. दरम्यान, त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला आदित्य ठाकरेंची साथ मिळणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की, राज्यात हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारविरोधात कोणी बोलले तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. कोणी काही बोलले की, चौकशी लावा, तुरुंगात टाका, तडीपार करा, हे सगळे चालले आहे. हे सर्व हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे, किंबहुना हुकूमशाही आलीच आहे. सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारता, किशोरी पेडणेकर यांना छळता, ऋतुजा लटकेंना छळले, महिलांचा छळ सुरू आहे. आज राजकीय लोकांना सतावत आहेत; उद्या पत्रकारांनादेखील छळतील, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या