मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सवाल : कोणाचा फोटो कशावर टाकायचा हे देखील कळत नाही का?
मुंबई : कोरोनामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील परिस्थिती फार गंभीर बनली आहे. सर्व सामान्य नागरिकांना याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. नागरिकांना वेगवेगळ्या पातळीवर मदत केली जात आहे. त्यातच शिवसेनेकडून करण्यात आलेल्या मदतीवर मनसे नेते संदीप देशपांडेंनी टीका केली आहे.
शिवसेनेकडून कुलाबा विधान परिसरात महिलांसाठी ५०० सॅनिटरी नॅपकिन्सच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा फोटो या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटावर छापण्यात आला होता. यावरून शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत देखील जाहिरातबाजी केली जात असल्याचे म्हटले जात आहे.
Read More केवळ अधिक चाचण्या केल्यानं कोरोनापासून वाचवता येणार नाही-देवेंद्र फडणवीस
मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सवाल केला आहे की, कोणाचा फोटो कशावर टाकायचा हे देखील कळत नाही का? आता म्हणतील राजकारण नको. आधीच फोटो छापले होते का?’ असा देखील प्रश्न विचारला आहे. सॅनिटरी पॅडवरून राजकारण होताना दिसत आहे. सध्या मुंबईत कोरोनाचा कहर जास्त आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणे सील करण्यात आली आहेत. अशावेळी महिलांना कंन्टेन्मेंट झोनमधून बाहेर पडणे कठीण आहे. अशावेळी अनेक संस्था, राजकीय पक्ष पुढे येऊन मदत करत आहेत. अशावेळी त्या मदतीवर जाहिरातबाजी करणे किती योग्य? असा सवाल निर्माण केला जात आहे. आदित्य ठाकरेंनी जाहिरातबाजी केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. आता शिवसेने राजकारण नको असे म्हणेल. पण यांनी कशावर फोटो टाकायचा याचा तरी विचार करायचा? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
कायरे लाचारानो हे पण आधीच छापले होते का? कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको pic.twitter.com/JyTMJ86eJa
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 21, 2020