27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआदित्यनाथ यांनी मान्य केली प्रियांकांची विनंती

आदित्यनाथ यांनी मान्य केली प्रियांकांची विनंती

एकमत ऑनलाईन

1 हजार बस चालू देण्याबाबत  विनंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मान्य केली

नवी दिल्ली: स्थलांतरित मजुरांसाठी 1 हजार बस चालू देण्याबाबत कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केलेली विनंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मान्य केली आहे. या बसच्या तपशीलासंदर्भात आदित्यनाथ यांनी प्रियांका गांधी यांना पत्र पाठवून विचारणा केली आहे. या बसचे क्रमांक, चालकांची नावे आणि मार्गांचे तपशील त्यांनी मागवले आहेत.

प्रियांका गांधी यांनी 16 मे रोजी एका व्हिडिओ संदेशाद्वारे योगी आदित्यनाथ यांना या बस संदर्भात परवानगी मागितली होती. उत्तर प्रदेशात औरिया इथे या मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात होऊन 26 मजूर ठार झाले होते आणि 36 जण जखमी झाले होते. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी मजुरांच्या वाहतुकीसाठी 1 हजार बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती.

Read More  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : 1 कोटी नवे रोजगार तयार करण्यावर लक्ष द्या

राजस्थान सरकारने या बस उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या बस उत्तर प्रदेशच्या सीमेवर उभ्या होत्या. मात्र उत्तर प्रदेश सरकारकडून स्थलांतरीत मजूरांच्या वाहतुकीला परवानगी दिली गेली नव्हती. त्यामुळे या बस तेथेच उभ्या राहिल्या होत्या. प्रियांका गांधी यांनी ट्‌विट करून या स्थलांतरित मजूरांना मदत करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या