नवी दिल्ली: कोरोनायोद्धा म्हणून मैदानात असलेल्या आरोग्य तसेच, अन्य सुरक्षा कर्मचाºयांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन वापरावे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे. या औषधामुळे कोरोना संसर्गाची शक्यता कमी होते, असे आयसीएमआरने म्हटले आहे. मात्र, या औषधाने कोरोनाविरुद्ध पूर्ण संरक्षण लाभल्याचा समज करून गाफिल राहू नये, असाही इशाराही आयसीएमआरने दिला आहे.
Read More सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर!
आरोग्यसेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली एम्स, आयसीएमआर, राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या इस्पितळांमधील तज्ज्ञांच्या संयुक्त देखरेख गटाने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची शिफारस केली आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह (एम्स) तीन केंद्र सरकारी इस्पितळांमधील आरोग्य कर्मचाºयांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.