24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयबचाव करण्यासाठी 70% अल्कोहोल असलेलं हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला

बचाव करण्यासाठी 70% अल्कोहोल असलेलं हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, 02 जून : कोरोनाव्हायरसपासून  बचावाचा मार्ग म्हणजे हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणं आणि ते शक्य नसेल तेव्हा हँड सॅनिटायझर वापरणं. मात्र हँड सॅनिटायझर वापरल्यामुळे त्वचेचे आजार तर बळावणार नाहीत ना, असा प्रश्न प्रत्येकाला पडला. किंबहुना अशा बातम्याही देण्यात आल्या. हँड सॅनिटायझरच्या दुष्परिणामबाबत अशाच एका बातमीबाबत केंद्र सरकारची नोडल एजन्सी पीआयबीने स्पष्टीकरण दिलं आहे.

Read More  माझ्या बाळाला तुम्ही बरं केलंत, तुमचे उपकार

50 ते 60 दिवस सातत्याने हँड सॅनिटायझर लावल्याने त्वचेचे आजार किंवा कॅन्सर होतो अशा आशयाची ही बातमी होती. मात्र ही बातमी चुकीची असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे.हँड सॅनिटायझरमुळे कोणताही त्वचेचा आजार किंवा कॅन्सर होत नाही. असं ट्विट PIB ने केलं आहे.हँड सॅनिटायझर माणसांसाठी घातक नाही. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी 70% अल्कोहोल असलेलं हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असं पीआयबीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या