चेन्नई : आयपीएलमध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे विराट, गंभीर आणि अफगाणी खेळाडू यांच्या वादाची. दरम्यान, विराटसोबत भांडण केलेला अफगाणी खेळाडू चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार एम एस धोनीला भेटल्याने क्रिकेट विश्वात एकत खळबळ माजली आहे.
लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आयपीएल २०२३ मधील ४३ वा सामना वादांच्या भोव-यात होता. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा पहिल्यांदा अनुभवी अमित मिश्रासोबत वाद झाला. यानंतर कोहलीचा नवीन-उल-हकसोबत वाद झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांमधील वातावरण आणखीनच बिघडले आणि मग यावरून भारतीय क्रिकेट संघातील दोन बडे खेळाडू गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही जुंपले.
दरम्यान, धोनी आणि नवीन-उल-हक दोघांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या फोटोने क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नवीन माहीला त्याच्या जवळ पाहून हसत आहे. धोनीच्या या भेटीनंतर अफगाणच्या या खेळाडूच्या स्वभावात बदल होईस असा विश्वास क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. कोहली आणि नवीन यांच्यातील भांडणानंतर सोशल मीडियावर चाहते अफगाणिस्तानच्या खेळाडूवर खूप नाराज आहेत. नवीनने यापूर्वीही आपल्या वरिष्ठ खेळाडूंशी वाद घातला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही ट्विट करून नवीनला सल्ला दिला.