नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आफताब पुनावाला याला दिल्ली कोर्टाने १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आफताबची आंबेडकर रुग्णालयात सोमवारी नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये एफएसएल अधिका-यांची टीम उपस्थित राहणार आहे.
दिल्ली पोलिस आज आफताबला घेऊन काही काळ आंबेडकर रुग्णालयात पोहोचले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नार्को टेस्टच्या आधी रुग्णालयात काही नियमित वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या केल्यानंतर आफताबला कोर्टात हजर करण्यात आले होते.