19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeराष्ट्रीयआफताबचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज; उद्या होणार सुनावणी

आफताबचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज; उद्या होणार सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरणामुळे सगळा देश हादरला आहे. यातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला आहे.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आफताबने दिल्लीच्या साकेत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, आफताबने नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये आपला गुन्हा कबूल केला आहे.

श्रद्धाच्या खुनाविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं आणि त्याची नार्को तसंच पॉलिग्राफ टेस्ट केली. यामध्ये त्याने खुनाची कबुली दिली आहे. तसेच श्रद्धाचे तुकडे त्याने ज्या ठिकाणी टाकले होते, तिथे काही हाडे सापडली आहेत. ही हाडे श्रद्धाचीच असल्याचे काल फॉरेन्सिकच्या तपासणीत सिद्ध झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या