तब्बल 8 वर्षांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर लेपन प्रक्रिया होणार

  468

  पंढरपूर : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी मूर्तीला वज्रलेप करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विधी व न्याय विभागाने वज्रलेप करण्यास मान्यता दिली आहे. तब्बल 8 वर्षांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर लेपन प्रक्रिया होणार आहे.

  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येतं. पदस्पर्श, मंदिरातील वातावरण आणि मूर्तीवर होणारे राजोपचार यामुळे मूर्तीची झीज होत आहे. याबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मूर्तीला वज्रलेप करण्यास परवानगी द्यावी, असा ठराव महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. या ठरावाला आता मान्यता मिळालेली आहे. पुरातत्व विभागाच्या तज्ञांशी चर्चा करुन आषाढी एकादशीच्या पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप होऊ शकतो, अशी माहिती विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
  यापूर्वी 2005 आणि 2012 साली श्रीविठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया पार पडली आहे. यामुळे मूर्तीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

  पालख्यांबाबत अखेर तोडगा निघाल्याचं चित्र
  आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघणाऱ्या पालख्यांबाबत अखेर तोडगा निघाल्याचं चित्र आहे. देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं आहे. आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवले जाणार आहे. मानाच्या सात पालखी दशमीला जाईल, पायी वारी जाणार नाही, पादुका विमान हेलिकॉप्टर किंवा विमान यावर निर्णय घेतला जाईल. दशमीला यावर निर्णय होईल.परंपरेचा सांगड घालण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे. सरकार इतर वाहन किंवा विमान उपलब्ध करणार आहे. पालखी बरोबर कमीत कमी वारकरी असतील. पादुकांचं प्रस्थान अष्टमीला होईल, दशमीला पंढरपूरला जाईल.

  Read More  अबू धाबीच्या कंपनीनं जिओ मध्ये गुंतवले 9,093.60 कोटी