28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रकोरोनानंतर महाराष्ट्रावर आता ‘स्वाईन फ्लू’चे संकट

कोरोनानंतर महाराष्ट्रावर आता ‘स्वाईन फ्लू’चे संकट

एकमत ऑनलाईन

मुंबई : गणेशोत्सवाला सुरुवात होत असतानाच स्वाईन फ्लूने राज्याच्या चिंतेत भर पाडली आहे. यावर्षी १ जानेवारी ते २८ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे २,३३७ रुग्ण आढळले असून ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने गणेशोत्सवात सहभागी होताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य विभागाने सांगितले की, ही प्रकरणं १९ जिल्ह्यांमध्ये नोंदवली गेली आहेत. त्यापैकी ७७० प्रकरणं आणि ३३ मृत्यू पुण्यात झाले आहेत. विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ३४८ रुग्ण आढळून आले असून तीन मृत्यू झाले आहेत, तर शेजारच्या ठाण्यात ४७४ रुग्ण आणि १४ मृत्यू झाले आहेत. या कालावधीत कोल्हापुरात १५९ प्रकरणं आणि १३ मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात ९८ जणांचा मृत्यू
आकडेवारीनुसार, यावर्षी १ जानेवारी ते २८ ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वाईन फ्लूचे २ हजार ३३७ रुग्ण आढळून आले असून ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूचे वाढते रुग्ण पाहता नागरिकांनी आगामी सण सावधगिरीने साजरे करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. इन्फ्लूएंझासारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे आणि लोकांनी सार्वजनिक मेळाव्यात कोविड-१९ नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पुण्यात सर्वाधिक ७७० रुग्ण
१ जानेवारी ते २८ ऑगस्ट दरम्यान पुण्यात सर्वाधिक ७७० रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल ठाणे (४७४), मुंबई (३४८), नाशिक (१९५) आणि कोल्हापूर (१५९) आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ३३ मृत्यूंसह पुण्याचा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ ठाणे (१४), कोल्हापूर (१३), नाशिक (१२), सातारा (५), अहमदनगर (५) आणि मुंबई (३) यांचा क्रमांक लागतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या