16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनानंतर जगात चापरेचा कहर

कोरोनानंतर जगात चापरेचा कहर

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक बाधित आढळले असून मृतांची संख्याही वाढत आहे. कोरोना विषाणूसोबत दोन हात करत असताना आता आणखी एका विषाणूमुळे अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगाची चिंता वाढणार आहे. चापरे, असे या विषाणूचे नाव असून, अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनेही (सीडीसी) याला दुजोरा दिला आहे.

चापरे विषाणूबाधित असलेले काही रुग्ण दक्षिण अमेरिकेत आढळले आहेत. या आजाराची लक्षणे डेंग्यू आणि इबोलासारखी आहेत. या विषाणूंची बाधा झाल्यास ताप येतो आणि या तापाचा परिणाम थेट मेंदूवर होतो. या विषाणूंमुळे ब्रेन हॅमरेजचा धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जॉर्जटाउन विद्यापीठातील संशोधक कॉलिन कार्लन यांनी सांगितले की, बाधित व्यक्तिच्या संपर्कात येणाºया व्यक्तिंनाही या विषाणूची बाधा होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाधा होण्यास सुरुवात झाल्यानंतर चापरे संसर्गामुळे आरोग्य व्यवस्था आणखी कोलमडून पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या चापरेची बाधा झाल्यास कोरोना अथवा इतर तापाच्या आजारापेक्षा या आजाराची लक्षणे लवकर आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता
विषाणूंची बाधा झाल्यास ताप येतो आणि या तापाचा परिणाम थेट मेंदूवर होतो. या विषाणूंमुळे ब्रेन हॅमरेजचा धोका असल्याचे जॉर्जटाउन विद्यापीठातील संशोधक कॉलिन कार्लन यांनी सांगितले

चापरे नाव का?
बोलिव्हियातील चापरे भागात हा विषाणू २००४ मध्ये आढळला होता. त्यावरून या विषाणूला चापरे हे नाव ठेवण्यात आले. मागील वर्षी बोलिव्हियात पाच जणांना या विषाणूची बाधा झाली होती. त्यातील तीनजण हे आरोग्य कर्मचारी होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता.

आजाराची लक्षणे आणि उपचार
चापरे विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींना ताप येणे, पोटात दुखणे, उलट्या, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर व्रण उठणे, डोळे चुरचुरणे आदी लक्षणे आढळून येतात. या आजारावर अद्यापही ठोस औषध, उपचार सापडले नसून करोनाप्रमाणेच या आजारावरही उपलब्ध असलेल्या औषधांद्वारे उपचार करण्यात येतात.

बायडेन मंत्रिमंडळात दोन भारतीय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या