22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयकोरोनानंतर आता नोरोव्हायरसची धास्ती ; आढळले दोन रुग्ण

कोरोनानंतर आता नोरोव्हायरसची धास्ती ; आढळले दोन रुग्ण

एकमत ऑनलाईन

तिरुअनंतपुरम: भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा उचल खालली आहे. महाराष्ट्रात व केरळमध्ये करोनाच्या नव्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे. कोरोनाचा धोका असतानाच आता नोराव्हायरस या नवीन आजाराने धास्ती वाढवली आहे. केरळमधील विझिंजममध्ये नोरोव्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत.

केरळच्या अल्पुज्जा जिल्ह्यातील कायाकुलम प्राथमिक शाळेतील मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ८ विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर या मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच उपचारांदरम्यान दोन मुलांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर प्रशासनाने तातडीने मुलांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

नोरोव्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. ज्या क्षेत्रात हे रुग्ण सापडले आहेत तेथेल नमुने गोळा करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग तातडीने उपाययोजना करत असून राज्यातील नागरिकांनी चिंता करु नये, असं अवाहन आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटलं आहे. नोरोव्हायरस आजारावर मात करता येऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नोरोव्हायरस अस्वच्छतेमुळं अधिक फैलावू शकतो. त्यामुळं या व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छता व साफसफाई आवश्यक आहे. तसंच, हा व्हायरस स्पर्श करण्यानेही अधिक फैलावतो. नोरोव्हायरस प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला जाणारा एक व्हायरस आहे. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टीनल आजार होऊ शकतो. दूषित जागेच्या संपर्कात आल्यामुळे किंवा दूषित अन्न पोटात गेल्यामुळे या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. त्याशिवाय एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीलाही याचा संसर्ग होऊ शकतो. इतकंच नाही तर नोरो व्हायरसचे अनेक प्रकार असल्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हापुन्हा नोरोव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.

नोरोव्हायरसची लक्षणे
उलटी किंवा मळमळसोबतच पोटदुखी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी.
जंतुनाशकही या व्हायरसला समुळ नष्ट करु शकत नाही.
६० अंश तापमानातच हा व्हायरस जिवंत राहू शकतो
पाणी उकळून पिणे किंवा क्लोरिन टाकूनही व्हायरस नष्ट होत नाही
हँड सॅनिटायझर वापरूनही हा व्हायरस जिवंत राहू शकतो

उपाययोजना काय
नोरोव्हायरसपासून बचाव करण्यासाठी पाणी भरपूर पिणे. त्यातबरोबर, कोमट पाण्याने हाथ वारंवार धुणे, साफ-सफाई करत राहणे. तसंच, प्राण्यांशी संपर्क येणार नाही याची काळजी घेणे. त्याचबरोबर, ताजं अन्न खा.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या