17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रमुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांकडून शोक व्यक्त

मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांकडून शोक व्यक्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी निधन झालं. पंतप्रधान मोदींसह राज्यातल्याही प्रमुख नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही फोटो शेअर करत यादवांच्या आठवणी जागवल्या आहेत. मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. आणीबाणीच्या काळात ते लोकशाहीच्या लढ्यातले प्रमुख सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले. त्यांचे संसदीय कामकाज अभ्यासपूर्ण होते आणि राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर त्यांनी भर दिला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 • लोकशाहीचा सैनिक हरपला : पंतप्रधान मोदी
  पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी यादव यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये मोदींनी मुलायम सिंह यादव यांना आणीबाणीच्या काळातील लोकशाहीचा सैनिक अशी उपमा दिली आहे.
 • प्रेमळ दिलदार नेता गेल्याचे दु:ख : सुप्रिया सुळे
  संसदेत ते सर्वांशी प्रेमाने वागायचे. शेती, राजकारण, समाजकारण या सर्व गोष्टींवर मनसोक्त चर्चा करायचे. त्यांच्याही वाईट वागणारे त्यांना सोडून जाणारे समोर आले तरी ते त्यांच्याशी प्रेमाने वागायचे. कष्टातून मोठा झालेला प्रेमळ दिलदार नेता आपल्यातून गेला याचं दु:ख खूप मोठे आहे. ते कायमच प्रोत्साहन द्यायचे. मोठ्या विचारांचे आणि प्रेमळ असे नेताजी मनाने दिलदार होते.
 • संसदेतील झुंजार नेतृत्व म्हणजे मुलायम सिंह यांच्याकडे पहिले जायचे – शरद पवार
  लेखक राम मनोहर लोहिया यांच्या विचार आणि लेखनाच्या दृष्टिकोनातून मुलायम सिंह राजकारण पहायचे. संसदेत एक झुंजार नेतृत्व म्हणून मुलायम सिंह यांच्याकडे पहिले जायचे. ते गेल्याचं दु:ख खूप मोठं आहे.
 • ते भरून न निघण्यासारखं आहे. राजकारणात त्यांच मोठ योगदान आहे. आम्ही एकत्र काम केलं. त्यांच काम आम्ही जवळून पाहिलं आहे. ते सर्वांचा विचार करायचे. ते शेतकरी असो, कष्टकरी असो ते सर्वांचा विचार करायचे. आमच्या दोघातला दुवा होता तो म्हणजे चंद्रशेखर.

चंद्रशेखर आणि मुलायम सिंह यांचे घनिष्ठ संबध होते तसेच माझे आणि चंद्रशेखरचे घनिष्ठ संबध होते. पण मुलायम सिंहजी यांची विचारधारा ही डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यासारखी होती माझ्याकडून आणि पक्षाकडून त्यांना श्रद्धांजली देतो असं शरद पवार यांनी म्हंटले आहे.

 • उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले.उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह जी यांचे मोठे योगदान आहे. मी त्यांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो ही प्रार्थना, असे ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलायम सिंग यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या