22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच!

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणाबाबत भाकित वर्तवले आहे. मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी किती तयार आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिले. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच!’, असा दावा जयंत पाटलांनी केला आहे.

आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहीत नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
‘‘मध्यावधी निवडणुका लागल्यास भाजप आणि शिंदे गटाला ते तितके सोपे जाणार नाही.

कारण लोकांना सोज्वळ, प्रामाणिक मुख्यमंत्री पाहायची सवय लागली आहे. त्या लोकांचा सध्या अपेक्षाभंग झाला आहे’’, असे जयंत पाटील म्हणाले. पाच वर्षे आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावतो. ‘‘२०२४ ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्तेत येतो, असे भाजपने म्हटले असते तरी लोकांनी त्यांना स्वीकारले असते.

पण आता महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेले लोकांना पटलेले नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील’’, असेही पाटील म्हणाले.

कोट्यवधींच्या देवाणघेवाणीतून सरकार आले!
सरकार स्थापनेच्यावेळी काही देवाणघेवाण झाल्याचे जयंत पाटील म्हणाले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले तेव्हा कोट्यवधींची देवाणघेवाण झाली. हे सगळे महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असे वाटत नाही. शिंदे गटालील आमदारांचे पुढच्या टर्मला निवडून येणे कठीण आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या