23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रपरीक्षा शुल्क माफीच्या मागणीसाठी अभाविपचे आक्रमक आंदोलन

परीक्षा शुल्क माफीच्या मागणीसाठी अभाविपचे आक्रमक आंदोलन

एकमत ऑनलाईन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आक्रमक वळण लागले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांच्या कार्यालयात घुसून आंदोलन केले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी परीक्षा नियंत्रक कार्यालयाचे गेट बंद केले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांना न जुमानता प्रवेशद्वारामध्ये घुसून आंदोलन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवक क्रांती दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी अभाविपकडून उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव नसल्याने विद्यापीठातील कारभारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचा आरोप अभाविपने केला. यावेळी विद्यापीठाचे प्रशासन व्हेंटिलेटरवर असल्याचे दर्शवण्यासाठी अभाविपने चक्क रुग्णवाहिका विद्यापीठात आणली होती.

पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याचे विद्यार्थी संघटनांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या