22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडनांदेडमध्ये फडणवीसांसमोर तरुणांची आक्रमक घोषणाबाजी; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

नांदेडमध्ये फडणवीसांसमोर तरुणांची आक्रमक घोषणाबाजी; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

एकमत ऑनलाईन

नांदेड : वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यभरात मोठा गदारोळ झाला. हा प्रकल्प राज्याच्या हातातून निसटल्याने लाखो तरुणांची नोकरीची संधी हिरावली गेल्याने सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. अशातच आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिस भरतीच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या तरुणांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणा-या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांना तरुणांच्या आक्रमक घोषणाबाजीचा सामना करावा लागला. पोलिस भरतीच्या मागणीसाठी तरुणांकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचेही पाहायला मिळाले. ‘गेल्या काही वर्षांपासून पोलिस भरतीची प्रक्रिया केली जात नाही. परिणामी तरुणांसमोर रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ ही भरती करावी,’ अशी मागणी आंदोलनकर्त्या तरुणांनी केली आहे.
दरम्यान, तरुणांच्या आक्रमक आंदोलनानंतर राज्य सरकार पोलिस भरतीबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या