22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयआंदोलनकर्त्या काँग्रेस नेत्यांसह राहुल गांधींही पोलिसांच्या ताब्यात

आंदोलनकर्त्या काँग्रेस नेत्यांसह राहुल गांधींही पोलिसांच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज दुस-यांदा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. या चौकशी विरोधात काँग्रेसच्या वतीने राजधानी दिल्लीसह देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. या सर्वामध्ये पोलिसांकडून आंदोलन करणा-या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..

यामध्ये विजय चौकात एकटेच आंदोलनाला बसलेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याआधी सोनिया गांधींच्या ईडी चौकशीला विरोध करणा-या काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढ़ी, केसी वेणुगोपाल, दीपेंद्र हुडा यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनी लाड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ईडीकडून दुस-यांदा चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी २१ जुलै रोजी, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कथित मनी लाड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी यांची जवळपास साडे तीन तास चौकशी केली होती. तर गेल्या महिन्यात जूनमध्ये राहुल गांधी यांची जवळपास ५० तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळीदेखील काँग्रेसने सलग ५ दिवस निदर्शने केली होती.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, आज राजघाटावर काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपचे लोक असते तर त्यांनी जाळपोळ केली असती, आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. ईडीने देशात दहशत निर्माण केली असून, ईडीकडे खूप अधिकार आहेत. ईडी स्वत:ला वेगळे समजत आहे. यापूर्वी राहुल यांना पाचवेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर आता सोनियाजींना चौकशीसाठी वारंवार बोलावले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या