23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्र‘सत्तेविना मती गेली’...

‘सत्तेविना मती गेली’…

एकमत ऑनलाईन

 शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवर मनसेचे खोचक ट्वीट
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड या नवीन सहका-याला घेऊन आपण खांद्याला खांदा लावून लढणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या या युतीवर मनसेने टीका केली आहे. मनसे आमदार राजू पाटील आणि मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्वीट करत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
‘सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली’, असे ट्वीट करून राजू पाटील यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. युतीनंतर शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच आता मनसेनेही या युतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. मनसे नेते गजानन काळे यांच्यापाठोपाठ मनसे आमदार राजू पाटील यांनीही जोरदार टीका केली आहे.

मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांचे ट्वीट
‘‘ए ग्रेड ‘ठाकरी’ राजकारणाला सोडचिठ्ठी. बी ग्रेड ‘आखरी’ राजकारणाशी हातमिळवणी. ‘म-हाठा ते मराठा’ विचारांशी नाळ जुळलेलीच नसेल तर अत्यंत वेगाने युती/आघाडीसाठी झेड ग्रेडपर्यंत येतील! येतील म्हणजे यायचंच!! किंबहुना, पोहोचायचंच’’ असे ट्वीट करत शिंदे यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर टीका केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या