26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयविकास कामांसाठी दुबईसोबत करार

विकास कामांसाठी दुबईसोबत करार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये विकास कामांसाठी दुबईसोबत करार करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाकडून या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. या कराराअंतर्गत काश्मीरमध्ये रिअल इस्टेट, इंडस्ट्रियल पार्क, आयटी टॉवर, बहुउद्देशिय इमारती, वैद्यकीय महाविद्यालये, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि इतर विकास कामे करण्यात येणार आहेत.

काश्मिरमध्ये गुंतवणूक करण्यास दुबई तयार असल्याचे याआधी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते की, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून सर्व काही सुरुळीत सुरु व्हावे म्हणजे आपण एकमेकांसोबत काम करून अर्थव्यवस्थेला उभारी देऊ. भारत आणि युएई सरकार यांच्यातील संबंध दृढ झाल्याने भारताला फायदा झाला असेही त्यांनी म्हटले होते. कलम ३५० आणि ३५ ए न्यायालयाने फेटाळून काश्मीरच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर केले होते. आज काश्मीरमध्ये विकास होत आहे. युएई सरकार इथे गुंतवणुकीसाठी इच्छूक आहे. भारतासाठी यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. भारताच्या भविष्यासाठी हे चांगले संकेत असल्याचे पीयूष गोयल म्हणाले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या