23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिकसह परिसरात मुसळधार पाऊस

नाशिकसह परिसरात मुसळधार पाऊस

एकमत ऑनलाईन

नाशिक : गणपतीच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, रायगड परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात देखील रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. गेला आठवडाभर नाशिक शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने गंगापूर धरणातून २ हजार ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

गेला आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्यातील काही भागात हजेरी लावली आहे. नाशिक परिसरात आठ दिवसांनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह शहर परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून २ हजार ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे.

मागील आठवडाभर दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळी तासभर मुसळधार हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी देखील जोरदार सरी कोसळल्या. तर बुधवारच्या मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे आज सकाळी ८ वाजल्यापासून २ हजार ५०० क्युसेकने गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे.

राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी
बुधवारी सर्वत्र गणरायाचे वाजतगाजत आगमन झाले. गणपतीच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. दरम्यान, आज देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यात हजेरी लावली आहे. गेल्या १५ दिवसांपासून तिथे पाऊस झाला नव्हता.

शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर तिथे चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. तसेच वर्धा शहरासह ग्रामीण भागांमध्ये जोरदार पाऊस बरसला आहे. आज सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या