28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रकृषिमंत्री सत्तारांच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ या उपक्रमाला सुरुवात

कृषिमंत्री सत्तारांच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ या उपक्रमाला सुरुवात

एकमत ऑनलाईन

अमरावती : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ या उपक्रमाला आजपासून सुरुवात होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कृषिमंत्री सत्तार हे एक दिवस शेक-यांसोबत राहणार आहेत. शेतक-यांना शेती करताना काय अडचणी येतात, शेतकरी आत्महत्या करण्याचा मार्ग का निवडतो, या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात त्यांनी केली आहे.

या उपक्रमाची सुरुवात आजपासून विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या मेळघाटातून झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावातील शेतकरी शैलेंद्र सालकर यांच्याकडे ते रात्री मुक्कामी राहिले. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावातील शेतक-यांनी तसेच गावक-यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. त्यांचे औक्षण देखील केले.

आज मेळघाटातील साद्राबाडी या गावातून ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतक-यांशी चर्चा करणार आहेत. शेतक-यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी हे संपूर्ण एक दिवस शेतक-यांसोबत राहून संवाद साधणार आहेत. तसेच प्रत्येकाच्या अडचणी समजून घेणार आहेत.

शेतक-यांच्या अडचणी समजून घेणार
सुलभ आणि प्रभावी कृषीविषयक धोरण तयार करण्यासाठी शेतक-यांना येणा-या अडचणी आणि प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतक-यांसोबत व्यतीत करून शेतकरी समस्यांच्ये मुळापर्यंत जाणार आहेत. त्यासाठीच राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’हा उपक्रम राज्यभर राबवण्याची संकल्पना मांडली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या