23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रअहमदशहा, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शहा

अहमदशहा, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शहा

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी मुंबई दौ-यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या याच टीकेला अनेक शिवसेना नेत्यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहांच्या मुंबई दौ-यावरून जहरी टीका केली आहे. अहमदशहा, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शहा.. अशा शब्दांत त्यांनी अमित शहांवर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करताना म्हटले आहे की, अहमदशहा, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शहा..दिल्लीवरून किती शहा आले राज्य जिंकण्यासाठी, पण गद्दारांची साथ घेऊन मराठी मावळा चवताळून उठला तसेच आजही करायची वेळ आली आहे. जनता शिवसेनेसोबतच! जय महाराष्ट्र!

हेच तर शिवसेनेचे नैतिक यश
मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने गेल्यावर्षीसुद्धा बैठका घेतल्या होत्या. तसेच आत्ताप्रमाणेच मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्याचा निश्चय गेल्यावर्षी भाजपने केला होता, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे यावेळी सुद्धा ते अयशस्वीच ठरणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. तर अमित शहा यांच्यासारखे देशपातळीवरील भाजपचे नेते मुंबईत येतात हे शिवसेनेचे नैतिक यश असल्याचे दानवे म्हणाले.

यांना आम्ही जमिनीवर आणू
उद्धव ठाकरे यांना जमिनीवर आणले पाहिजे, अशी टीका अमित शहा यांनी केली. त्याला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे जमिनीवरच आहेत. मुळात भाजपच आकाशात असून, त्यांना जमिनीवर आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचे दानवे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या