34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeएअर इंडियाला पुढील १० दिवस मधल्या सीटचे बुकिंग करता येणार

एअर इंडियाला पुढील १० दिवस मधल्या सीटचे बुकिंग करता येणार

: सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या संदर्भात विमानामधील मधली सीट रिकामी ठेवण्याबाबत आज सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी जाणाºया विमानांमधील मधली सीट रिकामी होणे आवश्यक असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाने पुढील १० दिवसांपर्यंत विमानांमधील मधील सीटवरील बुकिंगची परवानगी दिली आहे. मात्र, या नंतर मधील सीटचे बुकिंग करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने एअर इंडियाला म्हटले आहे. एअर इंडियाने लोकांची चिंता करण्याची आवश्यकता असल्याचे नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

मधली सीट रिकामी न ठेवणे ही चिंतेची बाब असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मधली सीट रिकामी न ठेवण्याबाबतचे सक्युलर चिंताजनक असल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. हा आदेश अधिसूचित नसलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आहे. केंद्र सरकार वंदे भारत अभियानांतर्गत इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचे काम करत आहे. पहिल्या टप्प्यात ब्रिटनमधून २,००० हून अधिक भारतीयांना परत आणले गेले आहे.

Read More  अनैतिक संबंध ठेवले म्हणून पतीनेच काढला पत्नीसह दोन मुलांचा काटा

मुंबई हायकोर्टाच्या मधली सीट रिकामी सोडण्याच्या आदेशाला एअर इंडिया आणि केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या तातडीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी एअर इंडियाला निर्देश देताना म्हटले की, पुढील १० दिवस एअर इंडिया मधल्या सीटचे बुकिंग करू शकते.

हायकोर्टाचे न्यायाधीश आर. डी. धानुका आणि न्यायाधीश अभय आहूजा यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणावर सुनावणी घेतली. दरम्यान, आजपासून देशांतर्गत विमान वाहतुकीची सुरुवात करण्यात आली आहे. नवी दिल्लीहून देशातील विविध राज्यामध्ये आज विमानांनी उड्डाणे केली. देशव्यापी लॉकडाउनच्या २ महिन्यांनंतर विविध राज्यामधील विमान वाहतूक सुरू करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. सर्व प्रवाशांना एअरलाइन्सतर्फे फेस कव्हर मास्क देण्यात आले. फ्लाइट अटेंडंटदेखील पीपीई किट घालूनच दिसले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या