27.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमाळेगाव कारखान्यात वायूगळती; १३ कामगार अत्यवस्थ

माळेगाव कारखान्यात वायूगळती; १३ कामगार अत्यवस्थ

एकमत ऑनलाईन

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्यात साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना तयार झालेल्या मिथेन वायू मुळे 13 कामगार अत्यवस्थ झाल्याची घटना आज दि( 23 )रोजी घडली. त्यांच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कारखाना कार्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Read More  गृहमंत्र्यांचा कडक इशारा : अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकाल तर खपवून घेणार नाही

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिथेन वायू तयार झाल्याने कामगारांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागला त्यामुळे ते अत्यवस्थ झाले. युवराज जनार्धन तावरे, घनश्याम हनुमंत निंबाळकर , प्रवीण हिरालाल वाघ , रामचंद्र सायबु येळे , सुनील हिराजी पाटील , जालिंदर भोसले , शिवाजी लक्ष्मण भोसले , बाळासो यशवंत ढमाळ , शशिकांत जागांन्नाथ जगताप , सुनील शिवाजी आरोडे , सोमनाथ कोंडीबा चव्हाण , शरद पांडुरंग तावरे , संजय हरिभाऊ गावडे यांच्यावर उपचार सुरू आहेत . घटनेचे वृत्त कळताच संचालक योगेश जगताप , नितीन सातव , गुलाबराव देवकाते , राजेंद्र ढवाण , सतीश अटोले आदीनी रुग्णालयात धाव घेतली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या