मुंबई : डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ ही आपली पाच ज्ञानेंद्रिये आहेत. यामुळे आपल्याला पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, चव आणि वास घेणे याचे ज्ञान होते. दिसणे किंवा ऐकणे याप्रमाणेच गंध म्हणजेच वास घेणे हीदेखील एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. गंध न आल्याने आपल्या जीवनावर वेगळा परिणाम होऊ शकतो. कोविड-१९ आजाराच्या लक्षणांपैकी एक म्हणजे चव किंवा वास न येणे. श्वसन संसर्गाचाही या महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियावर वाईट परिणाम होतो. यामध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचाही समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते वाढत्या वायू प्रदूषणामुळे आपली वास घेण्याची क्षमता कमकुवत होत आहे.
हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. आधी राजधानी दिल्लीत हवा वाईट असल्याचे म्हटले जायचे. पण आता आर्थिक राजधानी मुंबईतील हवाही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. थंडीच्या मोसमात मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. या हिवाळ््यात फुफ्फूस आणि श्वसनाच्या आजारांचा धोका वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
वाहने, वीज केंद्रे आणि आपल्या घरांत इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणात कॉस्टार पीएम २.५ सारखे घातक प्रदूषक हवेत पसरतात. हे श्वासावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतात. आपल्या मेंदूच्या खालच्या भागात नाकपुडीच्या अगदी वर, घाणेंद्रिय नावाचा टिश्यू असतो. हा एक अतिशय संवेदनशील भाग असतो. हे आपल्याला गंध ओळखण्यास मदत करतात. मेंदूमध्ये प्रवेश करणा-या विषाणू आणि प्रदूषकांपासून आपले संरक्षण करणारा हा टिश्यू आहे. पण वाढत्या प्रदूषणामुळे त्यावरील संरक्षक कवच हळूहळू खराब होऊ लागले आहे.
डॉ. रामनाथन दीर्घकाळापासून अॅनोस्मियाच्या रुग्णांवर संशोधन करत आहेत. ज्यामध्ये त्यांनी अॅनोस्मियाने ग्रस्त लोक उच्च पीएम २.५ प्रदूषण असलेल्या भागात राहत होते का, याचाही अभ्यास करण्यात आला. पुढे त्यांनी सांगितले की, मेक्सिको शहरामधील लोकांपेक्षा ग्रामीण भागात राहणा-या लोकांची वास घेण्याची क्षमता कमी आहे. म्हणजेच शहरांमध्ये राहणा-या लोकांपेक्षा ग्रामीण भागात राहणा-या लोकांची वास घेण्याची क्षमता अधिक चांगली आहे.
अॅनोस्मियाचा धोका
बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिन येथील रायनोलॉजिस्ट मुरुगप्पन रामनाथन जूनियर यांनी बीबीसीला दिलेल्या अहवालात संशोधनानुसार सतत प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने अॅनोस्मिया होण्याचा धोका १.६ ते १.७ पटीने वाढतो. अॅनोस्मिया म्हणजे वास घेण्याची क्षमता कमी होते.
पीएम हवेचे कण
मोजण्याचे एकक
हवेबाबत बोलताना पीएम २.५ किंवा पीएम १० या शब्दाचा उल्लेख होतो. गुणवत्तेच्या नियमनासाठी हवेतील विविध कणांचे त्यांच्या व्यासानुसार म्हणजेच आकारानुसार वर्गीकरण केले जाते. यासाठी पीएम हे एकक वापरले जाते. हवेतील १० मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी व्यास असलेले कण श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात. हे कण आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकतात. काही कण अतिशय सूक्ष्म म्हणजे २.५ मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाचे असतात, यांचा पीएम २.५ असे म्हटले जाते.