नगर : राज्यात सध्या जोरदार सत्ताकारण सुरू आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांचे एकमेकांवर पलटवार, शह-प्रतिशह सुरू आहेत. अशातच भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं एक विधान चांगलंच चर्चेत येतंय.
विखेंनी अजित पवारांना भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली आहे.
नगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपाचे सरकार आणावे. अजित पवारही स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे.