27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रअजित पवार अजूनही कोरोना पॉझिटिव्ह

अजित पवार अजूनही कोरोना पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असताना अजित पवाह हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. रविवारी आणि सोमवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यावेळी नवीन सरकारला बुहमत सिद्ध करावे लागणार आहे. यामुळे अजित पवार यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. मात्र, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीसे सरकार पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजसोबत नवीन सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांना तीन व चार तारखेला होणा-या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय गोंधळ सुरू असताना अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. अजित पवार यांंनी ट्वीट करून याची माहिती दिली होती. ‘काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून, डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या