कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याला संरक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी यांनी त्याचे रक्षण केले म्हणून छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक आहेत हे निश्चित आहे. तसंच संभाजी महाराजांनी धर्माचे सुद्धा रक्षण केले हे कोणीही नाकारत नाही. म्हणून संभाजीराजेंना धर्मरक्षक सुद्धा आहे, हे म्हटले तर चुकीचे नाही, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवार यांना ठणकावले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांना धर्मरक्षक म्हणू नये, असं विधान केलं होतं. त्यांच्या विधानामुळे भाजपने राज्यभरात निदर्शनं केली. तर संभाजीराजे यांनीही पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली.
मी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरवातीला संभाजीराजेंना मी धर्मवीर म्हणून संबोधतो. यापुढेही ते असेच राहणार आहे. अजित पवार म्हणतात संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. मात्र संभाजीराजे धर्मवीर आहेत याचे अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुस्तकाचे वाचन करून ते फक्त स्वराज्य रक्षक म्हटलं हे सांगावे. अजित पवार अर्धसत्य बोलले आहेत. ऐतिहासिक संदर्भ देताना पुस्तके वाचून द्यावे, असं आवाहनही संभाजीराजे यांनी केलं.
आमदार जे सभागृहामध्ये बोलतात त्यामुळे ते अधिकृत असते मात्र तिथे अभ्यासपूर्ण बोलणे गरजेचे आहे. सगळ्या पुढा-यांनी आताचा कालखंड बघून ३०० वर्षे मागची उदाहरणे देणे चुकीचे आहे. आपल्याकडे मोठा इतिहास आहे मात्र विकृत बोलून वाद निर्माण केले जातात. जबाबदार पुढा-यांना हे शोभत नाही, असा टोलाही संभाजीराजेंनी लगावला.
पुण्यात संभाजीराजेंच्या स्मारकाला किती फंड दिले यावर बोला,धर्मवीर आणि स्वराज रक्षक यावर बोलू नका. जयंिसगराव पवारांच्या पुस्तकातील संदर्भाही संभाजीराजे धर्मवीर असल्याचे आहेत. अरबी समुद्रात शिव स्मारकाचे अद्याप काम सुरू नाही यावर काही बोलणार नाही. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले ते काम पूर्ण का झाले नाही ते या सरकारने सांगावे, असंही संभाजीराजे म्हणाले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वैदिक स्कुल काढली. याचा अभ्यास सगळ्यांनी करावा राजर्षी शाहू महाराजांचे, शिवाजी महाराजांचे हिंदुत्व काय हे ऐन वेळी मी सांगेन, असंही संभाजीराजे म्हणाले