18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रअजित पवार पुन्हा नाराज?; गेल्या पाच दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’

अजित पवार पुन्हा नाराज?; गेल्या पाच दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. यादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे समोर येत आहे.

शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरालाही अजित पवार गैरहजर होते. यावर चार तारखेला शिर्डीत राष्ट्रवादीच्या शिबिरातून अजित पवार आजोळी गेले आहेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. मात्र अजितदादा आपल्या आजोळी देवळाली प्रवरा येथे पोहोचलेच नाहीत.

मग अजितदादा गेले कुठे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून अजितदादा ‘नॉट रिचेबल’ असल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही शिर्डीत अजित पवार हजर नव्हते. या शिबिरात पहिल्या दिवशी अजित पवार यांचे जवळपास दीड तास भाषण झाले. त्यानंतर ते शिर्डीतून निघून गेले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून थेट शिबिराला हजेरी लावली होती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार थेट शिर्डीत पोहोचले होते. मात्र, अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर होते. यानंतर चर्चांना चांगलेच उधाण आले.
मनसे नेत्याचा गौप्यस्फोट –

या सर्व चर्चांदरम्यान मनसे नेत्याच्या ट्विटने लक्ष वेधले आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आमदार अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, ‘मिटकरी राजसाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारण्या अगोदर अजितदादा हे पवारसाहेबांवर नाराज होऊन काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का ? याचा खुलासा करावा..अजितदादांनी कंपू बदलला तर पळता भुई थोडी होईल तुमची.’

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या