27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअजित पवारांना सोडावे लागणार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद

अजित पवारांना सोडावे लागणार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संचालक मंडळ काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आले होते. या संघटनेचे अध्यक्ष शरद पवार होते. त्यामुळे हा राष्ट्रवादीला एक धक्का होता. अशातच आता आणखी एका संघटनेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. मात्र आता हे अध्यक्षपद त्यांना सोडावे लागणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे हंगामी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी ११ जुलैला या संदर्भातील परिपत्रक काढले. या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांनुसारच आता मराहाष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला आपल्या घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे. यामुळे यातील नियमांनुसार आता अजित पवारांना ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

यात एखाद्या व्यक्तीला दोन टर्म किंवा आठ वर्षांपेक्षा जास्त काळ संघटनेवर राहता येणार नाही, असा नियम आहे. अजित पवार हे २०१३-२०१७ आणि २०१७ पासून आतापर्यंत या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. हे अध्यक्षपद सोडल्यानंतर अजित पवार यांना स्पोर्टस् कोडनुसार पुढील ५ वर्षे एमओएमध्ये रेड कार्ड असेल. त्यामुळे त्यांना पाच वर्षे सदस्य वगळता इतर पदांवर संधी नसणार आहे.

अनिल खन्ना यांनी सूत्र हाती घेताच राष्ट्रीय स्पोर्टस् फेडरेशन, राज्य ऑलिम्पिक असोसिएशन, यूटी ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या अध्यक्षांना तसेच सचिव आणि महासचिवांना पत्र पाठवत संबंधित संघटनांच्या घटनेवर आक्षेप घेतला. यात अनेक त्रुटी असून तात्काळ स्पोर्टस् कोड लागू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. या कोडमध्ये महत्त्वाचे नियम आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या