27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रकुपोषणाच्या मुद्यावरुन विधानसभेत अजित पवारांचा हल्लाबोल

कुपोषणाच्या मुद्यावरुन विधानसभेत अजित पवारांचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात वातावरण चांगलेच तापले. राज्यात कुपोषणामुळे एकही बालक मृत्यूमुखी पडलेले नाही. इतर आजारांनी बालक मृत्यू पडल्याचे आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी विधानसभेत सांगितले. यावरुन विधानसभेत जोरदार राडाच सुरु झाला. कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंर्त्यांचा निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर पुन्हा सभागृहात आल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.

५० टक्के डॉक्टर कामावर नाहीत
अजित पवार यांनी म्हटले की, आदिवासी भागात बालमृत्यूचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. आज कुपोषण आणि बालमृत्यूला मान्य केले जात नाही हे दुर्दैव आहे. मेळघाटमध्ये कुपोषण आणि बालमृत्यूचे कलंक लागला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इथले दारिर्द्य आहे. ५० टक्के डॉक्टर कामावर नाहीत.

काहीजणांना मी विचारले तर ते म्हणतात आम्हाला मानधन कमी आहे. स्त्री रोग तज्ज्ञआणि बालरोगतज्ज्ञ गेल्या सहा महिन्यापासून नाहीत. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. महिला आणि बालविकास मंत्रालायतून जो निधी दिला जातो. त्याचा विनोयोग कसा होतो याचा ताळमेळ नाही. सकस प्रोटिनयुक्त आहाराचा अभाव तिथे आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

कमी वजनाची बालके जन्माला
अजित पवारांनी सांगितलं की, कमी वजनाची बालके जन्माला येत आहेत. अधिका-यांना आपण ३६५ दिवसात १५१ सुट्या देतो. गरोदर महिलेला ६ महिन्याची सुट्टी देतो. तसेच मनरेगाच्या माध्यमातून आदिवासी भागातील महिला काम करत असतात त्यांना देखील सुट्टीचा विचार करा, त्यांना सुट्टी मिळत नाही. आपण बाराही महिने अधिका
-यांना सुट्टी असली तरी पगार देतोच की तसंच या गरीब महिलांचा देखील विचार करा, असं अजित पवार म्हणाले.

मनरेगामध्ये आदिवासी महिलेच्या रजेची तरतूद करायला हवी
अजित पवार म्हणाले की, आदिवासी भागात वैद्यकीय सेवा चांगली देण्यात यावी. महिलांच्या आहाराकडे लक्ष दिले जात नाही त्यामुळे कुपोषण वाढलं आहे. बाल विवाह मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे कुपोषण वाढले आहे. आदिवासी भागात निधी दिला पाहिजे. मनरेगामध्ये आदिवासी महिलेच्या रजेची तरतूद करायला हवी. कुटकी,कोदो,बाजरा, सावा अश्या पद्धतीच्या पारंपरिक प्रोटीनयुक्त धान्याची बियाणे मिळत नाहीत त्यासाठी सरकारकडून पाऊल उचलायला हवीत. मेळघाटमध्ये जे कुपोषण निर्माण झाले आहे त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असे अजित पवार म्हणाले.

कुपोषणाने मृत्यू ही अतिशय गंभीर आणि आपल्या सर्वांसाठी लाजीरवाणी बाब
आदिवासी बांधव धरतीला आपली आई मानतात. ते निसर्गपूजक असून निसर्गालाच आपला देव मानतात. वर्षानुवर्षे निसर्गाशी एकरुप होऊन जगण्याचा प्रयत्न करणा-या या निसर्गपुत्रांवर आज कुपोषणाची वेळ आली आहे. राज्यातील आदिवासी भागात बालमृत्यूच प्रमाण मोठं आहे, मात्र सरकार यावर गंभीर नाही.

आदिवासी क्षेत्रातील बालमृत्यू आणि कुपोषणाच्या वास्तवाला मान्यच करत नाही. याची जबरकिंमत आपल्या राज्यातल्या आदिवासी बांधवांना भोगावी लागणार आहे. राज्यातील मेळघाटात १५ जुलै ते १५ऑगस्ट २०२२ या अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत १८ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे, आपल्या सर्वांसाठी लाजीरवाणी सुध्दा आहे. या बालमृत्यूंच्या घटनेबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून अत्यंत कडक भाषेत ताशेरे सुध्दा ओढले आहेत याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या