24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये अकाली दल-बसप पुन्हा एकत्र

पंजाबमध्ये अकाली दल-बसप पुन्हा एकत्र

एकमत ऑनलाईन

चंदिगढ : पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांना हालचाली सुरु केल्या आहेत. शिरोमणी अकाली दल आता मायावतींच्या बहुजन समाज पक्षासोबत निवड़णूक लढणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवार दि़ १२ जून रोजी करण्यात आली.

अकाली दलाने गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात भूमिका घेताना भाजपसोबतची युती तोडली होती. दरम्यान, या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आधीच नवज्योत सिंग सिद्धू सातत्याने टीका करत आहेत. त्यातच आता अकाली दल आणि बसप एकत्र आल्याने काँग्रेससमोर निवडणुकीत मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

पंजाबमध्ये ११७ पैकी २० जागा बसपला
विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युलाही युतीच्या घोषणेवेळी जाहीर करण्यात आला. पंजाबमध्ये ११७ जागांपैकी बहुजन समाज पक्ष २० जागा लढवणार असून, शिरोमणी अकाली दल ९७ जागांवर निवडणूक लढेल असेही सुखबीर सिंग यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री दलित समाजातील असणार
शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी घोषणा केली होती की, येत्या निवडणूकीत पक्षाने विजय मिळवून सरकार स्थापन केले तर उपमुख्यमंत्री हा दलित समाजातील असेल. यावेळी त्यांनी इतर पक्षांसोबत निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले होते. आपल्या संपर्कात अनेक पक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले होते़

लसींचा ‘मिक्स-अँण्ड-मॅच’ प्रभावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या