मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडिया ट्विटरवर ही माहिती दिली आहे. यामुळे तो पहिल्या दिवशी कान्सच्या रेड कार्पेट कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. पूजा हेगडे, एआर रहमान, शेखर कपूर आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमवेत तो भारतीय दलाचे प्रतिनिधीत्व करणार होता पण यापुढे त्याचा भाग असणार नाही.
अक्षय कुमारने ट्विट करून माहिती दिली
अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले, कान्स २०२२ मधील इंडिया पॅव्हेलियनमध्ये आमच्या सिनेमाची खरोखरच वाट पाहत आहे, पण दुर्दैवाने मला कोरोनाची लागण झाली आहे. त्याऐवजी विश्रांती घेईन. अनुराग ठाकूर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. मला तिथे असण्याची खरोखरच आठवण येईल.
१७ मे रोजी ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या दिवशी चित्रपटातील व्यक्ती रेड कार्पेटवर चालणार होत्या. प्रसिद्ध लोकगायक मामे खान, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि वाणी त्रिपाठी, दोन वेळा ग्रॅमी विजेते संगीतकार रिकी केज आणि उइऋउ चेअरमन प्रसून जोशी हे देखील महोत्सवातील भारतीय दलाचा भाग आहेत. मात्र आता अक्षय या महोत्सवात येऊ शकणार नाही.