23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeआंतरराष्ट्रीयअल कायदाचा प्रमुख सैफ अल-आदेल

अल कायदाचा प्रमुख सैफ अल-आदेल

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : ओसामा बिन लादेनचा विश्वासू सैफ अल-आदेल हा अल कायदाचा नवा प्रमुख बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने सोमवारी एक अहवाल प्रसिद्ध करत ही माहिती जारी केली. आदेल हा सध्या इराणमधून कार्यरत आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यात अयमान अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर सैफ अल आदेलची निवड करण्यात आली होती. मात्र, तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे अल कायदा सध्या याबाबत घोषणा करणे टाळत आहे.

अमेरिकेचे ८२ कोटींचे बक्षीस
२०२१ मध्ये सत्तेत आल्यानंतर तालिबान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वीकार्यता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांनी अमेरिकेसोबत एक करार केला होता. ज्यामध्ये ते कोणत्याही दहशतवादी संघटनेला आपल्या भूमीतून काम करू देणार नाहीत, असे लिहिले होते. अशा परिस्थितीत अल कायदाने सैफ अल आदेलला नवा प्रमुख म्हणून घोषित केल्यास तालिबानच्या अडचणी वाढू शकतात. अमेरिकेने आदेलवर ८२ कोटींचे बक्षीस ठेवले होते. आदेलनेच टांझानिया आणि केनिया येथील अमेरिकन दूतावासांवर हल्ले करण्याचा कट रचला होता.

आदेलच्या घोषणेला विलंब
आदेल दीर्घकाळ इराणमध्ये राहिल्यामुळे अल कायदाचा प्रमुख बनण्याबाबत मौन बाळगून आहे. हे अनेक सदस्यांचे मत आहे. सदस्यांचे म्हणणे आहे की, इराण हा शिया बहुसंख्य देश असून देशाची कमान शिया धर्मगुरूंच्या हातात आहे. तर अल कायदा ही सुन्नी दहशतवादी संघटना आहे. जे सहज धर्मांतरामुळे शिया लोकांना भ्रष्ट मानतात.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या