33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय अलकायदाचा दहशतवादी ठार

अलकायदाचा दहशतवादी ठार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इस्रायलने इराणमध्ये केलेल्या स्पेशल ऑपरेशनमध्ये अल-कायदाचा दुस-या क्रमांकाचा दहशतवादी ठार झाला आहे. १९९८ साली आफ्रिकेतील अमेरिकेच्या दोन दूतावासांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात त्याची भूमिका होती. इस्रायलने ऑगस्ट महिन्यात इराणमध्ये हे ऑपरेशन केले. गुप्तचर अधिका-यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

अब्दुल्लाह अहमद अब्दुल्लाह हा इराणमध्ये अबू मुहम्मद अल-मासरी नाव धारण करुन राहत होता. सात ऑगस्टला तेहरानच्या रस्त्यावर अब्दुल्लाह अहमदची बाईकवरुन आलेल्या दोघांनी गोळया झाडून हत्या केली. अबू मुहम्मद अल-मासरीकडे अल-कायदाचा सध्याचा म्होरक्या आयमन अल-झवाहीरीची उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. इराणमध्ये आश्रयाला असलेला मासरी आणि अल-कायदाच्या अन्य दहशतवाद्यांवर अमेरिकन यंत्रणांची मागच्या अनेक वर्षांपासून नजर आहे. अल-कायदाने त्यांच्या नंबर दोन दहशतवाद्याची हत्या झाल्याचे जाहीर केले नाही. इराणच्या अधिकाºयांनी सुद्धा त्या घटनेवर पडदा टाकला.

अमेरिकन अधिका-याचा माहिती देण्यास नकार
अमेरिकन अधिका-याने या माहितीवर शिक्कामोर्तब करण्यास तसेच अमेरिकेच्या सहभागाबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. स्थापनेपासून मासरी अल-कायदासोबत होता. अमेरिकेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडो पथकाने २०११ साली पाकिस्तानात स्पेशल ऑपरेशनमध्ये कंठस्रान घातले होते.

मांगल्य आणि सौजन्याने प्रतीक – लक्ष्मीपूजन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या