नांदेड: विशेष प्रतिनिधी
देशात कोरोना संसर्गजन्य आजाराने आहांकार निर्माण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात लॉकडाऊ नची घोषणा केली. त्या दिवसापासून सर्वच व्यवसाय बंद करण्यात आले होते. दारूच्या उत्पन्नातून प्रत्येक राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतांनाही कठोर निर्णय घेण्यात आला. ५0 दिवसानंतर दारू विक्रीस सुरुवात होणार असे सर्वत्र चित्र निर्माण होत असतांनाच नांदेड जिल्ह्यात हा निर्णय अजूनही लांबणीवर टाकण्यात आला आहे. गेल्या ५0 दिवसामध्ये दारू दुकाने बंद असली तरी चढ्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री झाली. यामध्ये राज्य शासनाला एकही रुपयाचा महसूल मिळाला नाही. त्यामुळे केवळ ‘दारू बदनाम हो गयी महसूल के लिए.. गल्ला भर गई ठेकेदार के लिए..!’ असे उघडपणे आज जिल्ह्यात ऐकावयास मिळत आहे.
मुंबई, पुणे, ठाणे हे शहर वगळता राज्यात घरपोच मद्य विक्रीला मान्यता देण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीपर्यंत घरपोच मद्य विक्रीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील २८ जिल्ह्यात ही घरपोच मद्यविक्री लागू होणार असली तरी नांदेड जिल्ह्यात मात्र जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी मात्र या निर्णयास नकार देत सोमवारपासून यावर विचार करण्यात येईल असे सांगितल्यामुळे अनेक तळीरामांचा हिरमोड झाला आहे. शेजारच्या लातूर जिल्ह्यात एक दिवसासाठी मद्यविक्री चालु करण्यात आली होती. तळीरामांनी गदारोळ केल्यामुळे तात्काळ एका दिवसात निर्णय बदलण्यात आला तर हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसासाठी दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात काही ठिकाणी दारू विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर दोन किलो मिटर रांगा लागल्या होत्या. अनेकांना पोलिसांचा प्रसाद देखील यामुळे खावा लागला. तरी देखील तळीरामांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. या भीतीमुळे नांदेड जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यात दारू विक्रीस परवानगी दिली नाही. केवळ ठेकेदारांची बैठक गुरुवारी घेण्यात आली. त्यांना दिलासा देण्यात आला. परंतु सायंकाळी उशिरा या निर्णयाला बगल देत सोमवारपासून दारू विक्रीस परवानगी देण्याच्या विचाराधीन आहोत असे सांगितल्या जात आहे.
Read More बीड हादरलं ! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
दिवसेंदिवस दारू विक्रीस विलंब होत असल्यामुळे दारू विक्रीच्या काळ्या बाजाराने मात्र कहर गाठला आहे. जिल्ह्यामध्ये देशी, विदेशीचे १९ दुकाने आहेत तर २५0 बिअर बार आहेत. १६0 देशी दारूची दुकाने आहेत तर ३५0 परमीट रुम आहेत. या सर्वांचा महसूल वर्षाकाठी ४४0 कोटी रुपये उत्पादन शुल्क विभागास मिळत असतो. गेल्या दोन महिन्यापासून ही सर्व दुकाने बंद असल्यामुळे जवळपास ८0 कोटीचे नुकसान राज्य शासनाला नांदेड विभागाकडून झाले आहे. या विभागाचे वेतन मिळणे देखील आता अवघड झाले आहे. यंदाचे टार्गेट पूर्ण होते की नाही याबद्दल शासंकता व्यक्त केली जात आहे.
एकिकडे राज्याचा महसूल बुडत असतांना दुसरीकडे ठेकेदार मात्र दिवसेंदिवस गब्बर होत असतांना पहावयास मिळत आहेत. ५00 रुपयांची क्वाटर जवळपास १५00 रुपयाला बिनदिक्कतपणे बाजारात विकली जात आहे. सुरुवातीच्या काळात कमी भाव असला तरी जसे जसे दिवस वाढत गेले तसा तसा दारूचा भाव देखील वाढत गेला. ग्रामीण भागात हातभट्टी निर्माण करण्याची स्पर्धा लागली होती. परंतु उत्पादन शुल्क विभागाने धाडी टाकून हातभट्टी पकडली असली तरी आजही मोठ्या प्रमाणात देशी दारू विकल्या जात आहे. किनवट परिसरात मोहफुलापासून तयार केलेली मोहाची दारू देखील मोठ्या चढ्या भावात मिळत आहे. जिल्ह्यात दारू बंद असल्यामुळे काहींचा कलह आता मोहाच्या दारूकडे वळला आहे. काही महाभागाने तर औषधी दुकानात जावून नशा येणा-या गोळया देखील घेण्यास सुरुवात केली आहे. असा प्रकार वाढत राहिला तर निश्चीतच तळीरामांवर मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण होणार आहे.
जिल्ह्यमाध्ये काही दुकानदारांनी तर दुकान फोडून दारू चोरीस गेले असल्याचे चित्र उभे केले आहे. जेणे करुन उत्पादन शुल्क विभागाला लेखाजोखा देण्याची गरज पडणार नाही. या अनुषंगानेच हा सर्व प्रपंच केला असल्याचे सांगितल्या जात आहे. शहरामध्ये तर ठेकेदारांनीच आपले काही दलाल निर्माण केले होते. त्या दलालामार्फत शहरामद्ये दारूविक्री केल्या जात होती. काही दारूचे ठेकेदार पहाटेच आपले दुकान उघडून दारूचा साठा बाहेर काढून दलाला मार्फत चढ्या भावाने दारूची विक्री करीत असल्याचे पहावयास मिळाले. गेल्या अनेक वर्षात प्रथमच अशी वेळ आली आहे. एवढा काळ कधीही दारूची दुकाने बंद राहिली नव्हती. हा सर्व कोरोनामुळेच परिणाम झाला असल्याचे दिसून आले.
दरम्यान राज्याचे नुकसान होत असतांना ठेकेदाराचे चांगभले करण्यासाठी प्रशासन पाऊ ल उचलत आहे का अशी शासंकता निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर देशी, विदेशी दारूची दुकाने सुरु नाही झाले तर निश्चीतच दबंग चित्रपटातील गाण्याच्या बोलाप्रमाणे… मुन्नी बदनाम हो गयी डार्लिंग तेरे लिये.. त्यामुळे असेच म्हणावे लागेल की, दारू बदनाम हो गयी महसूल के लिए… गल्ला भर गयी ठेकेदार के
लिये.